हिंगोलीच्या बैठकीत सगळे सोबत आहात ना रे बाबांनो... उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना फोन, शिवसेना पक्षप्रमुख नेमकं काय म्हणाले

सगळे सोबत आहात ना रे बाबांनो... उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना फोन, शिवसेना पक्षप्रमुख नेमकं काय म्हणाले

हिंगोली  प्रतिनिधी
05 जुलै 2022

 एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांमुळे महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता गेली. मात्र सोबतच शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. सध्या शिंदे गटाकडे एकूण ४० आमदार आहेत तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ १५ आमदार राहिले आहेत. त्यामुळे पुन्हा पक्ष उभा करण्याचं मोठं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. यासाठी त्यांनी तयारीही सुरु केली आहे. जिल्हा पातळीवर ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी हिंगोलीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधत, सगळे सोबत आहेत ना रे बाबा असा प्रश्न सर्वांना विचारला.
हिंगोलीतील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून संवाद साधला. हिंगोलीतील शिवसेनेचे एकमेव आ.संतोष बांगर हे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. यानंतर आज दुपारी हिंगोलीत शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. ही बैठक सुरू असतानाच आनंदराव जाधव यांच्या फोनवर उद्धव ठाकरे यांचा फोन आला आणि त्यांनी बैठकीतील शिवसैनिकांशी संवाद साधला. सगळे सोबत आहेत ना रे बाबा. शिवसैनिकांनो मला चिंता नाही कोण आले, कोण गेले. मी लढणार तुम्हा सर्वांची साथ आहे. त्यामुळे पुन्हा नव्या दमाने शिवसेना उभी करणार. लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात आपलं बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, शिवसेना पक्ष कोणाचा? यावर शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कोणी कितीही दावा करत असलं तरी खरी शिवसेना आमचीच आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. आमच्याकडे निम्म्यापेक्षा जास्त आमदार असून अजूनही लोक येत राहतील असे त्यांनी सांगितलं.
यावेळी शासकीय विश्रामगृह  येथे  पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव पदाधिकारी डॉक्टर रमेश शिंदे परमेश्वर मांडगे दिलीप बांगर राजू चापके संदेश देशमुख  उद्धव गायकवाड मंगला कांबळे यशोदाबाई कोरडे  यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने