सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ एनटीसी हिंगोलीच्या वतीने विविध उपक्रम व स्पर्धाचे आयोजन
हिंगोली/- प्रतिनिधी
31 ऑगस्ट 2022
येथील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ एनटीसी हिंगोली च्या वतीने गुरूवार दि. १ सप्टेंबर पासून विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धाचे आयोजन गणोशोत्सवात करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ एनटीसी हिंगोली च्या वतीने श्री. गणेशोत्सवात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ३१ आॅगस्ट रोजी रात्री श्री ची स्थापना छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात करण्यात आली आहे. गुरुवार दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात वृक्षारोपण व पाणी वाचवा या विषयावर प्रात्यक्षिक संपन्न होणार आहे. सायंकाळी ४ वाजता बालगटा साठी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शुक्रवार दि. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता सामाजिक सलोखा व मुलगी वाचवा या विषयावर मार्गदर्शन शिबीर श्री. आशिष मगर यांचे होणार आहे. दि. ४ व दि. ५ सप्टेंबर रोजी गौरी गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून हॅटस अप वर पाच छायाचित्रे व ३० सेंकद व्हीडीओ तयार करून सौ. ज्योतीताई कोथळकर, सौ. छायाताई मगर, सौ. विद्याताई पवार यांच्या मोबाईल नंबरवर आॅनलाईन पाठवावा, विजेत्यां उत्कृष्ट सजावट व देखाव्याला पारितोषिके देण्यात येतील. मंगळवार दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात तलवारबाजी प्रात्यक्षिक व चर्चासत्र श्री. संदीप वाघ ( राष्ट्रीय खेळाडू) यांचे होणार असून रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल. बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता देशभक्तीपर, पाणी वाचवा, मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणी, स्वातंत्र्य चळवळी संदर्भातील देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा महाप्रसाद व भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी श्री. ललित खुराणा व ओमप्रकाश देवडा पीपल्स बॅकेचे सहकार्य मिळाले आहे. शुक्रवार दि. ९ सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण व सायंकाळी ५ वाजता श्री ची विर्सजन मिरवणुक काढण्यात येणार आहे.
सर्व भाविक भक्तांनी विविध स्पर्धा कार्यक्रम व उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ एनटीसी हिंगोली च्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा