सोनसाखळी प्रकरणात कथास्थळी संशयीत महिला पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र 24न्यूज
27 ऑगस्ट 2022
हिंगोली : शहरात श्री हरतालिका शिवपुराण कथा सुरू असून मोठ्या संख्येने महिला भाविक प्रत्येक दिवशी येत आहेत. गर्दीची संधी साधून काही चोरटे सक्रिय झाल्याने २६ ऑगस्ट रोजी कथा स्थळावरून एका संशयीत महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आतापर्यंत पाच ते सहा
महिलांच्या गळ्यातले
सोन साखळ्या चोरी गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे
कथास्थळी एक संशयीत महिला निदर्शनास आल्याने भाविकांनी तिला पोलिसांच्या स्वाधीन केले. स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयीत महिलेची चौकशी सुरू असून सदरील महिला आग्रा येथील असल्याचे गुन्हे शाखेच्या वतीने सांगितले आहे.
अनेक चोरटे पोलिसाच्या रडावर
टिप्पणी पोस्ट करा