*तर.! निषेधार्थ शिंदे- फडणवीस सरकारचा पुतळा फुकणार .... किरण घोंगडे*
महाराष्ट्र 24 न्यूज
प्रतिनिधी /
हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सर्व पक्षिय जिल्यातील आमदारांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत आवाज बुलंद केला तेंव्हा सरकारने अधिवेशन संपण्यापूर्वी हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने शिंदे फडणवीस सरकारचा पुतळा फुकु अशा इशारा रिपब्लिकन युवासेना प्रदेशाध्यक्ष सरपंच किरण घोंगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला.
पुढे नमुद केले कि हिंगोली जिल्यात दोन महिन्यांपासून सतत पाऊस चालू आहे.
माघील काही दिवसांपूर्वी तर पावसाने हाहाकार केला होता,
मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकरयांच्या शेतीचे प्रंचड नुकसान झाले होते.
तर अनेक गाव पाण्याखाली जाऊन घरच घर बुडाली होती,संसार साहित्य वाहुन गेले होती
इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीचे व घराचे नुकसान होऊन देखील जिल्यातील काही तालूके वगळता पंचनामे करण्याचे आदेश देऊन तुटपुंज्या मदतीचे आश्वासन सरकारने दिले होते.
त्यात सेनगाव व वसमत तालुक्याचा समावेश करून उर्वरित औंढा, सेनगाव, हिंगोली तालुक्यातील शेतकरयांवर अन्याय करण्यात आला.
हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसगट तालुक्यातील पंचनामे करून हेक्टरी किमान 50 हजारु सानुग्रह अनुदान देण्यात यावे.
अशी मागणी विधानपरिषद आमदार डॉ प्रज्ञाताई सातव यांनी विधानपरिषद सभागृहात केली, तर वसमत विधानसभा आमदार राजु भैय्या नवघरे यांनी विधानसभा सभागृहात केली तर कळमनुरी विधानसभा आमदार संतोषराव बांगर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करत मागणी केली.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित नेते वसिमभाई देशमुख यांनी आमरण उपोषणाला बसले होते, रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यातील मागणीचे गांभीर्य ओळखून अधिवेशन संपण्यापूर्वी हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी किमान 50 हजारु सानुग्रह अनुदान देण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन युवासेनेच्या वतीने निष्क्रिय शिंदे - फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी पुतळा फुकण्याचा इशारा रिपब्लिकन युवासेना प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी दिला.
टिप्पणी पोस्ट करा