शिवाजी महाविद्यालयात सद्भावना पंधरवड्यानिम्मीत्त व्याख्यान
हिंगोली- येथील शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 20 ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या दरम्यान सद्भावना पंधरवाडा म्हणून साजरा केला जात आहे. या अंतर्गत महाविद्यालयाच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख व्याख्याते म्हणून हिंदी विभागाचे प्रा. सुनील कांबळे यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला, तसेच समाजामध्ये सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी ही तरुणांची आहे असे ते म्हणाले. उपप्राचार्य डॉ. क्षिरसागर बी.एस.यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये सामील न होता आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे व समाजामध्ये सामाजिक एकता कशी अबाधित राहील यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. बी.जी.गायकवाड यांनी तरुण म्हणजे देशाचं भविष्य आहे आणि त्यामुळे त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक एकता अबाधित कशी राहील हे पाहिले पाहिजे असे म्हणाले. यावेळी हर्षदीप पाईकराव या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांने आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रमुख डॉक्टर संगीता मुंढे यांनी केले तर आभार कनिष्ठ विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. बळीराम शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. मनीषा गवळी.,प्रा. संजय चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. बी. भाकरे, डॉ. एस. यु. ढाले(य.च.म.मु. वि. नाशिक) स्वयंसेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा