हिंगोलीत नांदेड परिक्षेत्र 27 व्या क्रीडा स्पर्धेचा दिमाखात समारोप

हिंगोलीत नांदेड परिक्षेत्र 27 व्या क्रीडा स्पर्धेचा दिमाखात समारोप 

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क24 सप्टेंबर 2022

हिंगोली ■ शहरात २७ व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रिडा स्पर्धेला २० सप्टेंबर पासून प्रारंभ झाला होता  चार जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी स्पर्धेसाठी दाखल झाले असून स्पर्धेत विविध खेळ प्रकारात अनेक स्पर्धकांनी आपले नैपुण्य दाखविल्याने अनेकांचे लक्ष वेधल्या गेले होते.

दिनांक 23 सप्टेंबर रोजी 
नांदेड परीक्षत्रिय पोलीस क्रीडा चा समारोप प्रसंगी 
हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते
यामध्ये
परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये अॅथेलेटिक्स, कुस्ती, बॉक्सींग, जुडो, त्वायकांदो, स्वीमिंग तसेच सांघीकमध्ये कबड्डी, खो खो, हॉकी, फुटबॉल, हॅण्डबॉल, हॉलीबॉल आदी स्पर्धा घेतल्या  २० सप्टेंबर पासून या स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. शहरातील सात मैदानावर विविध ठिकाणी स्पर्धा घेतल्या 
 जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट नियोजन आले आहे. २३ सप्टेंबर रोजी स्पर्धांचा दिमाखात समारोप साजरा करण्यात आला 
 नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा स्पर्धेत हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी या चार जिल्ह्यातील ५१२ पोलिंस अधिकारी, अंमलदार, महिला-पुरूष सहभागी स्पर्धेचा २३ निकाल जाहीर झाल्यानंतर
 विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोली , जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ चे समादेशक संदीपसिंह गिल्ल तसेच नांदेड, लातुर, परभणी येथील पोलिस अधिक्षकासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती  . स्पर्धेतील विजेत्यांना मेडल्स, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात  आले

27व्या नांदेड परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद ( general championship) नांदेड जिल्ह्याला तर उपविजेते पद हिंगोली जिल्ह्याला मिळाले 
नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत अनेक नामवंत पोलिस अधिकारी व कर्मचारी खेळाडु म्हणून सहभागी झाले होते  
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे   होम डी वाय एस पी आमले  पोलीस निरीक्षक
उदय खंडेराय पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे
सहाय्यक  पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू 
यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांनी  परिश्रम घेतले
ताण तणाव दूर करण्यासाठी आपल्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी खेळात नेहमीच सहभागी व्हावे 
असे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक  निसार तांबोली यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने