हिंगोलीत भाजपचे मोठे शक्तीप्रदर्शन

हिंगोलीत भाजपचे मोठे शक्तीप्रदर्शन 
 
महाराष्ट्र24 न्यूज 
नेटवर्क24 सप्टेंबर 2022

• हिंगोली लोकसभा प्रवास योजेनेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकुर हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून २३ सप्टेंबर शुक्रवार रोजी त्यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोली विधानसभा मतदार संघात आ.तान्हाजीराव मुटकुळे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.
केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकुर हे हिंगोली, वसमत विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामासह अनेक उपक्रम व नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याकरीता 

   २३ सप्टेंबर रोजी ना. शंतनू ठाकुर यांनी सकाळी हिंगोली शहरातील देवडानगर भागामध्ये नगर परिषदेच्या उद्यानातील स्मृती स्तंभास भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पांगरी येथे जाऊन जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांपैकी सर्वात ज्येष्ठ असलेले गांजवे यांची भेट घेऊन नमन केले. यानंतर हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शहरामधील विविध प्रमुख मार्गावरून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष 
तथा माजी आमदार रामराव वडकुते, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, माजी आमदार गजाननराव घुगे, भाजपा नेते रामदास पाटील सुमठाणकर, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, माजी नगरसेवक गणेश बांगर, उमेश गुठ्ठे, अॅड.के.के. शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती हरीशचंद्र शिंदे, अभियंता पी. आर. देशमुख, संदीप वाकडे, जय घोडे, डॉ.उमेश नागरे, प्रशांत उर्फ गोल्डी सोनी, हमीदभाई प्यारेवाले यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने