33 के व्ही उपकेंद्र कानडखेडा बू. आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते उद्घाटन*

*33 के व्ही उपकेंद्र कानडखेडा बू.  आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते उद्घाटन*

6 सप्टेंबर 2022

हिंगोली तालुक्यातील कानडखेडा बु.येथे खूप दिवसापासून रखडलेले 33 के व्ही कामाचे आज उद्घाटन हिंगोली विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते पार पडले. व अध्यक्ष म्हणून सौ सुलोचनाताई भालेराव  सरपंच कानडखेडा बुद्रुक हे होते.
छायाचित्र    धम्मपाल जोगदंड
उद्घाटन प्रसंगी  आमदार म्हणाले की जवळपास परिसरातील जसे की कानडखेडा बु, वांझोळा, कनेरगाव नाका, कानडखेडा खू.मोप,पिंपरी वायचळ,कलबुर्गा, वाढोना, चींचपुरी अशा अनेक गावांना या उपकेंद्र चा लाभ मिळणार आहे. व विजेचा कायमस्वरूपी  प्रश्न सुटलेला आहे असे सांगितले. त्यावेळी प्रास्ताविक उप कार्यकारी अभियंता दिनकर पिसे  यांनी महावितरण कंपनीला लाईट बिल संदर्भात सहकार्य करा आपल्या सर्व परिसरात विजेचा कोणताही प्रश्न भेडसावु देणार नाही हे आश्वासन दिले.
त्यावेळी उद्घाटन प्रसंगी सौ रंजनी देशमुख  (उप.कार्य.अभियंता) सौ दैवशाला समाधान पठाडे उपसरपंच, निर्मलाताई  डोळसकर ग्रा.स., रामचंद्र गावंडे माजी पं. स. सदस्य, श्रीदेवी पाटील  (ठाणेदार गोरेगाव), बाबुराव जाधव पोलिस उपनिरीक्षक कनेरगाव, किसनराव गावंडे भाजपा जि. उपाध्यक्ष, संदीप गावंडे,गजानन निरगुडे सरपंच लिंबाळा, शंकर पाटील उपसभापती मा. स., राजू पाटील माळसेलूकर, प्रवेश भाई कॉन्ट्रॅक्टर.
व इतर गावकरी मंडळी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने