हिंगोलीत महिलेचा विनयभंग शहर पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 7 सप्टेंबर 2022
हिंगोली शहरातील श्रीनगर रिसाला बाजारात एका महिलेच्या घरात घुसून आरडाओरड केल्यास तीला ठार मारण्याची धमकी देऊन तीचा विनयभंग केल्याने हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली शहर पोलिसात
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील श्रीनगर, रिसाला बाजार भागात राहुल गौतम धुळे रा. ज्योतीनगर दाखल हिंगोली या आरोपीने ३१ वर्षीय महिला राहत असलेल्या घरात ३० ऑगस्टला रात्रीच्या सुमारास प्रवेश
करून आरडाओरड केल्यास ठार मारण्याची धमकी देऊन महिलेस तु खूप आवडतेस असे म्हणून तीचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने ६ सप्टेंबर रोजी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावरून राहुल गौतम धुळे याच्यावर विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठुबोने हे करीत आहेत
टिप्पणी पोस्ट करा