माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान जिल्हा स्तरीय शुभारंभ
दिनांक 23/09/2022 रोजी नर्सिंग कॉलेज जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित यामोहिमेचा शुभारंभ मा मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्यातील 18 वर्ष वयोगटावरील सर्व महिला,माता,गरोदर स्त्री यांची सर्वांगीन तपासणी साठी दिनांक 26/09/2022 रोजी पासून नवरात्री उत्सवात महिलांच्या आरोग्य तपासणी बाबत चा "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" हे अभियान राबविणे चालू आहे या मोहिमेचे उ्दिष्टे राज्यातील 18 वर्ष वयोगटावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्री, यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक, व उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे व सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे हे उ्दिष्टे आहे यामध्ये जिल्ह्यातील 18 वर्ष वयोगटावरील महिला, माता, गरोदर स्त्री यांची दिनांक 26/09/2022 रोजी नवरात्री उत्सवात पासून हि मोहीमेचे शुभारंभ करून 18 वर्ष वरील महिला, माता, गरोदर स्त्री यांची आरोग्य तपासणी करने चालू करण्यात आले आहे या मोहिमेची जिल्ह्यत जास्तीत जास्त जनजागृती करून हि आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी, यांच्या मार्फत घरोघरी माहिती देण्यात जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरात आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने,यांनी केले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ सचिन भायेकर, , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मंगेश टेहरे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ लांजेवार, डॉ दीपक मोरे,डॉ गोपाळ कदम,नर्सिंग प्राचार्य श्रीमती कवित्ता, जिल्हा लेखा व्यवस्थापक शंकर तावडे,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीपाद गारुडी भालेराव, ज्ञानेश्वर चौधरी, पत्रकार सुधाकर वाढवे,डॉ वसुंधरा खैरे,डेंटल सर्जन डॉ प्राची पाटेकर,डॉ माधवी घट्टे, डॉ होळकर, मनिषा वडकुते,आशा बाजीराव क्षीरसागर, श्री केळकर,आनंद साळवे, मल्हारी चौफाडे, सतीश नलगे, केशवराव घुगे, नर्सिंगकॉलेज येथील सर्व अधिकारी कर्मचारी, व विद्यार्थी , इत्यादी.
टिप्पणी पोस्ट करा