यापुढे महाराष्ट्र पोलिसांनी खाकी वर्दी घालून नाचू नये!
गणेश विसर्जन मिरवणुकीची महासंचालकांकडून गंभीर दखल
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क21 सप्टेंबर 2022
मुंबई: यापुढे महाराष्ट्र पोलिसांनी खाकी वर्दी घालून नाचू नये, अशा स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक पोलिसांचे नाचतानाचे व्हिडिओ समोर आले होते. या व्हिडिओवरून सोशल मीडियावर बरीच झाली. पोलिसांनी मिरवणुकीत नाचणे कितपत योग्य ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी या सगळ्या प्रकारणात गंभीर दखल घेत सूचना जारी केल्या आहेत. गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त
राज्यभर लावण्यात आला होता. सलग ड्युटी करून थकलेल्या पोलिसांचा उत्साह मिरवणुकीतल्या ठेक्याने वाढवला, असा एक सूर सोशल मीडियातील चर्चेत उमटला होता. दुसरीकडे कर्तव्यावर असताना मिरवणुकीमध्ये पोलिसांनी नाचणे अयोग्य असल्याचेही काही जणांचे म्हणणे होते. फक्त मुंबईतच नव्हे तर पुणे, कोल्हापूरमध्ये पोलिसांनी गणेश मिरवणुकीत सहभाग घेतल्याचे दिसून आले होते.
टिप्पणी पोस्ट करा