हिंगोली स्थानिक गुन्हे पोलिसांकडून तीन लाख रुपयाचे गांजाचे झाडे जप्त

 हिंगोली स्थानिक गुन्हे पोलिसांकडून तीन लाख 
रुपयाचे गांजाचे झाडे जप्त 
महाराष्ट्र 24न्यूज 
नेटवर्क 28 सप्टेंबर 2022 

 शासनाकडुन प्रतिबंधीत असलेल्या गांजाची उत्पादन घेणा - या विरुध्द एन.डी. पी.एस. कायदा अन्वये गुन्हा दाखल 33 W स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नियंत्रण कक्ष क्र . ( 02456 ) 220232 पोलीस अधीक्षक कार्यालय , हिंगोली दिनांक 28/09/2022 दिनांक २७ / ० ९ / २०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथे गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि , मौ . दुधाळा ता . औंढा नागनाथ येथील नामे विष्णु जाधव हा त्याचे शेतातील पिकांमध्ये गांजाची झाडे लावली आहेत . अशा माहीती वरून मा . पोलीस अधीक्षक श्री . एम . राकेश कलासागर साहेब यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री . उदय खंडेराय यांनी तपास पथक व पंचासह लगेच दुधाळा गावातील विष्णु जाधव याचे शेतामध्ये जावुन पाहणी केली असता नमुद इसम विष्णु शंकर जाधव याचे शेत गट क्र . ४३१ मधील कापुस व तुरीच्या उभ्या पिकामध्ये ओळीने विना परवाना शासनाने प्रतिबंधीत केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाची एकुण लहान मोठी असे ६३ झाडे मिळुन आली . सदर गांजाच्या झाडाची वनज काटयावर मोजमाप केली असता त्याचे वनज ५१ किलो ५०० ग्रॅम भरले आहे . ज्याची एकुण किंमत ३,० ९ , ००० / - रू . एवढी आहे . सदर मुददेमाल तपासकामी पोलीसांनी जप्त केले असुन पो.नि. श्री . उदय खंडेराय यांचे तकारी वरून पो.स्टे . औंढा नागनाथ येथे आरोपी विष्णु शंकर जाधव रा . दुधाळा याचे विरूध्द गुरनं . ३२८/२०२२ कलम ८ ( क ) , २० ( ब ) ii ( ब ) एन.डी.पी.एस. कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कार्यवाही मा . पोलीस अधीक्षक श्री एम . राकेश कलासागर , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री . उदय खंडेराय , सपोनि . राजेश मलपिलू , पोलीस अंमलदार संभाजी लेकुळे , सुनिल अंभोरे , नितीन गोरे , राजुसिंग ठाकुर , ज्ञानेश्वर सावळे , किशोर सावंत , विठठल काळे , आकाश टापरे , ज्ञानेश्वर पायघन , शेख जावेद , प्रशांत वाघमारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा , हिंगोली यांनी केली आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने