विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
3सप्टेंबर 2022
ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्या आणि प्रश्न अद्यापही न सोडविल्यामुळे दि २ सप्टेंबरपासून ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांनी असहकार आंदोलनाला सुरूवात केली असून गटविकास अधिकारी बोथीकर यांना मागण्याचे निवेदन सादर केले आहे.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी शासनाचे विविध प्रकारचे अभियान, विविध कल्याणकारी योजना राबवित आहेत. परंतु शासनाकडे वेळोवेळी प्रलंबित मागण्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी पत्रव्यवहार, आंदोलन करूनही दखल घेत नसल्यामुळे असहकार आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात माहे जानेवारी २०२१ ते जुलै २०२२ पर्यंत ग्रामसेवक संवर्गाच्या पगारी नियमित व वेळेवर न झाल्याने
जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांचेवर कार्यवाही करावी, पगारीतून कर्जाचे हप्ते कपात होऊनही शेड्युल वेळेवर न पाठविणाऱ्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही, जीपीएफ आणि एनपीएस च्या स्लीप्स अचूक न देणाऱ्यांवर कार्यवाही, सहाव्या वेतन आयोगाचे हमे जीपीएफमध्ये आतापर्यंत जमा न झाल्याने संबंधितांवर कार्यवाही करावी, वैद्यकीय परीपूर्तता बील अदा करावेत, निलंबीत ग्रामसेवकांना सेवेत घ्यावेत, कोरोना काळात मयत झालेल्या ग्रामसेवकांना बीमा कवच द्यावे, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरीत करावेत, कंत्राटी ग्रामसेवकांची १० हजार अनामत रक्कम परत द्यावी, ई टेंडर व इतर शासकीय कपातीबाबत प्रशिक्षण द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजू भगत, सचिव रवि बिल्लावार, एम टी कपाटे, एस एस जवंजाळ, बी के गव्हाणे, डी पी सोनटक्के यांच्यासह पदाधिकारी व ग्रामसेवकांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा