हिंगोलीत हरतालिका शिवपुराण कथेत एका महिलेचे अडीच लाखाचे दागिने लंपास
हिंगोली प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज
हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील मार्केट कमिटीच्या यार्डत
26 ऑगस्टला श्री हरतालिका शिवपुराण कथे दरम्यान एका महिलेच्या गळ्यातील अडीच लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना हिंगोलीत घडली आहे
अकोला बायपास रामकृष्ण नगरातील श्यामल भालचंद्र भावसार ही महिला हरतालिका शिवपुराण कथा ऐकण्यासाठी आली होती
एक सप्टेंबरला शहर पोलिसात महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या कार्यक्रमात अनेक महिलांचे दागिने चोरी गेले असून
महाराजांच्या कार्यक्रमात महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी महिलांचे दागिने चोरी जात असतात अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे
चोरी प्रकरणी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव हे करीत आहेत
टिप्पणी पोस्ट करा