मौजे तामटी तांडा सरपंचपदी सौ.शिवकन्या विजय जाधव यांची बिनविरोध निवड...!

आ.संतोष बांगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे तामटी तांडा येथील सरपंचपदी सौ.शिवकन्या विजय जाधव यांची बिनविरोध निवड.

आ. संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा भव्य सत्कार मोठ्या थाटात संपन्न

हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे तामटी तांडा येथील ग्रामपंचायत बिनविरोध होऊन सरपंचपदी एकमताने सौ.शिवकन्या विजय जाधव यांची निवड करण्यात आली.*
       *निवडणूक म्हणलं की अमाप
 खर्च,वेळप्रसंगी भांडणे सुद्धा होतात आणि गावातील सलोख्याचे वातावरण बिघडण्यास निवडणूक कारणीभूत ठरते,परंतु राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर  यांच्या मार्गदर्शनाखाली तामटी तांडा येथील ग्रामपंचायत बिनविरोध निवडण्यात आल्याने नवनिर्वाचित सरपंच सौ शिवकन्या विजय जाधव यांचा भव्य सत्कार आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते हिंगोली येथे करण्यात आला.*
         यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, बंजारा समाजाचे नेते ऍड संतोष राठोड, ज्ञानेश्वर जाधव, विश्वनाथ मांडगे, भुजंग भगत, पंढरी मगर,संदीप राठोड, गजानन चव्हाण, किरण चव्हाण, उल्हास राठोड, रमेश राठोड, मोहन जाधव, ओमनाथ राठोड, अविनाश चव्हाण, बाळू राठोड,रामा चव्हाण,बाबुराव राठोड,प्रेमदास पवार,कृष्णा राठोड,मोगल राठोड,राहुल जाधव,पंडित जाधव,रुस्तुम जाधव,कनिराम जाधव,देविदास राठोड, प्रकाश जाधव,भारत जाधव,बाळू जाधव,प्रेमदास जाधव,सुभाष जाधव,गणेश जाधव,संजय जाधव,ज्ञानेश्वर जाधव,प्रफुल्ल जाधव,शिवाजी जाधव,आंबादास जाधव,विष्णू जाधव,मंगु राठोड,गुलाब जाधव,सुभाष भुजंग,बबन यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने