सरपंचाला 30 हजारांची लात घेताना पकडले : लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाची कारवाई
कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथे पोल्ट्रीफॉर्म टाकण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून 30 हजाराची लाच घेतांना सरपंचाला हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (04 ऑक्टोबर) दुपारी रंगेहाथ पकडले.
कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथे पोल्ट्रीफॉर्म टाकण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून 30 हजाराची लाच घेतांना सरपंचाला हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (04 ऑक्टोबर) दुपारी रंगेहाथ पकडले. ओम कदम ( रा. वारंगाफाटा) असे सरपंचाचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कदमांकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी
केली होती
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील एका व्यक्तीस वारंगा फाटा शिवारामध्ये पोल्ट्री फार्म उभारायचे होते. त्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदाराने वारंगाफाटा येथील सरपंच ओम कदम यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र त्यासाठी सरपंच कदम याने 30 हजार रुपयांची मागणी केली. सदर रक्कम आज वारंगा फाटा येथे देण्याचे ठरले होते.
या प्रकरणात तक्रारदाराने थेट हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपतचे उपाधिक्षक निलेश सुरडकर, पोलिस निरीक्षक विजय पवार, प्रफुल्ल अंकूशकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सय्यद युनूस, जमादार विजय उपरे, तान्हाजी मुंडे, राजाराम फुफाटे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, विजय शुक्ला, महिला पोलिस कर्मचारी योगीता अवचार यांच्या पथकाने काल दुपारी वारंगाफाटा येथे सापळा रचला.होता
दरम्यान ठरल्या प्रमाणे काल दुपारी वारंगाफाटा येथे एका कृषी केंद्रात दुपारी सरपंच कदम यांने 30 हजाराची लाच स्विकारताच यास रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी रात्री उशीरा आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
टिप्पणी पोस्ट करा