हिंगोलीत आज ५१ फुटी रावणाचे दहण तगडा पोलीस बंदोबस्त

हिंगोलीत आज ५१ फुटी रावणाचे दहण
तगडा पोलीस बंदोबस्त

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क 5 आक्टोंबर 2022

हिंगोली येथील ऐतिहासीक, पारंपारीक व जगप्रसिद्ध दसरा महोत्सवात आज ५  ऑक्टोबर बुधवार रोजी रात्री १०.०५ रामलिला मैदानावर अनेक मान्यवर व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रावण दहणाचा भव्य सोहळा संपन्न होणार आहे.
अयोध्या येथील रामलिला मंडळीतर्फे सादर त करण्यात येणाऱ्या रामलिला कार्यक्रमात लंकेत राम-रावण सेनेत युद्धात लक्ष्मणकडूनच्या बाणाने मेघनाथ उर्फ इंद्रजीतचे तसेच रामच्या बाणाने कुंभकर्ण व रावणचे वध करण्याचा प्रसंग दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर रावणची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून  हिंगोली: आजच्या रावण दहणाकरीता दसरा महोत्सव समितीतर्फे सुरू असलेली जय्यत तयारी बिबीषण या कलावंताच्या हस्ते धार्मिक विधी केल्यानंतर रावणच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार असल्याची माहिती रामलिला मंडळी प्रमुख रविंद्रदास यांनी दिली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नेत्रदिपक आतिषबाजी करण्यात येणार आहे.
या महोत्सवासाठी दसरा समितीमधील विश्वस्त उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष उमाकांत पारथी, तहसीलदार तथा सचिव नवनाथ वगवाड, सदस्य आमदार तान्हाजीराव मुटकुळे, वकील संघ अध्यक्ष अॅड. किरण नर्सीकर, महंत कौशल्यदास महाराज, स्वातंत्र्य सैनिक अध्यक्ष माणिकराव

टाकळगव्हाणकर, पंचायत समिती बिडीओ गणेश बोथीकर, आदर्श महाविद्यालय प्रभारी प्राचार्य डॉ. विलास आघाव यांच्यासह नायब तहसीलदार मधुकर खंडागळे, मनोहर खंदारे, नागेश धनमने, दौलत बनसोडे, विश्वास नायक, गणेश साहू, राजेंद्र हलवाई, गणेश बांगर, सुधाकर वाढवे  तात्याराव बांगर, चंद्रकांत लव्हाळे, प्रकाश बांगर, धोंडीराज पाठक, कैलास श्रीनाथ, शाम शेवाळकर, विलास गोरे, बाबा घुगे, मयुर, प्रविण टाले, गुड्डू इंगोले, यशोदाताई कोरडे, बाळू जोशी महाराज यांच्यासह क्रीडा विभाग, होमगार्ड, सांस्कृतिक विभाग, विद्युत विभाग, स्वच्छता कर्मचारी आदींनी नोंदविला आहे. (प्रतिनिधी).

पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात

दसरा महोत्सवाच्या रावण दहणला जवळपास ५० ते ६० हजार नागरीक उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला आहे. या निमित्त कृषी प्रदर्शनी व रावण दहण प्रसंगी ८ पोलिस अधिकारी, १ दंगा काबू पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, ८० पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच साध्या वेशातही पोलिस कर्मचारी टेहाळणी करणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरही करडी नजर ठेवली जाणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने