माळवटा शिवारात ट्रकसह ३०० क्विंटल तांदूळ पकडला
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 12 ऑक्टोंबर 2022
हिंगोली वसमत ते नांदेड रस्त्यावरील माळवटा शिवारात एका ट्रकमधून स्वस्तधान्याचा ३०० क्विंटल तांदूळ ट्रकमधून विक्रीस नेण्यात येत असल्याच्या संशयावरून ट्रकसह तांदूळ असा एकूण १६ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलिस उपाधीक्षकांच्या पथकाने केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, ट्रक क्रमांक एम.एच.२६- बी. ई. ०४१२ यामधून स्वस्तधान्याचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीस नेण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे, जमादार राजू चव्हाण, रवी ढेंबरे, रंगनाथ सातभाई, गणेश दळवी यांच्या पथकाने माळवटा शिवारात सदर ट्रकला अडवून पाहणी केली असता त्यात तांदळाचे कट्टे आढळले. हा तांदूळ ३०० क्विंटल असून त्याची किंमत ४ लाख २० हजाराची आहे.
■ वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
■ तांदूळ काळ्या बाजारात विक्रीस नेत असल्याचा पोलिसांचा संशय
तसेच १२ लाख रुपयाचा ट्रक असा एकूण १६ लाख २० हजाराचा मुद्देमालं पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसात रवी ढेंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुखदेवसिंग जिबरसिंग खैरा रा. उल्हासनगर पंजाबी कॉलनी हॉस्पिटल जि. ठाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा