मनविसेचे अमित ठाकरे मोर्चेबांधणीसाठी हिंगोलीत; मनसे कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क
हिंगोली
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी मनविसे मोर्चेबांधणीसाठी हिंगोली दौर्यावर आले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे आगामी निवडणुकीच्या बांधणीच्या अनुषंगाने मराठवाडयाच्या दौर्यावर आले असुन याचा एक भाग म्हणुन ते हिंगोली जिल्हयात दोन दिवशीय दौर्यावर आले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पदाधिकार्यांचा आढावा बैठक घेतली. यावेळी दिलीप धोत्रे, शेतकरी सेनेचे संतोष नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत पदाधिकार्या सह विद्यार्थ्यां सोबत बैठक घेऊन संवाद साधत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबतीच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी संघटना काम करणार आहे असे, अमित ठाकरे म्हणाले.
पिपळखुंटा येथे पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बंडु कुटे, उपाध्यक्ष दिपक वडकुते, विनोद बांगर, जाबुवंत पाटील, तालुकाध्यक्ष दत्तराव देशमुख, विठ्ठलराव पतंगे, माऊली कामखेडे, दिकपराव सांगळे, टोपे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रवि मुदिराज, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष संतोष खंदारे, शहराध्यक्ष संतोष बांगर, कामगार सेना जिल्हाध्यक्ष मोहन बांगर, लाहोटी, कुलकर्णी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृष्णा जाधव, अतुल घुगे, अंजिक्य घुगे, रोहण तादळे आदी पदाधिकार्यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा