सूर्यग्रहण पाहण्यासाठी सौरचष्मे वाटप करणार

सूर्यग्रहण पाहण्यासाठी सौरचष्मे वाटप करणार

प्रतिनिधी | हिंगोली
महाराष्ट्र 24न्यूज
 नेटवर्क25ऑक्टोबर
2022

हिंगोली शहरातील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना सूर्यग्रहणाची खगोलीय घटना पाहण्यासाठी ॲस्ट्रॉनॉमिकल क्लबच्या वतीने सौरचष्मे वाटप केले जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिली.

याबाबत शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी सांगितले की, मंगळवारी (२५ ऑक्टोबर) दुपारी २.३० ते सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहण दुपारी साडेचार वाजता असणार आहे. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना बघण्याचा योग पाच वर्षांनंतर आला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग व हिंगोली ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने ही खगोलीय घटना पाहण्यासाठी जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर सौरचष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हिंगोलीतील खगोलप्रेमी नागरिक, विद्यार्थी, पालकांनी ही दुर्मिळ खगोलीय घटना पाहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, शिक्षणाधिकारी सोनटक्के व हिंगोली अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने