सूर्यग्रहणाकडे भौगोलिक दृष्टिकोनातून पाहावे!शिक्षणाधिकारी सोनटक्के यांचे मत

सूर्यग्रहणाकडे भौगोलिक दृष्टिकोनातून पाहावे!

शिक्षणाधिकारी सोनटक्के यांचे मत

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क26/10/2022
 हिंगोली : सूर्यग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे. त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहावे, अंधश्रद्धा बाळगू नये. या घटनेचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम मानवी जीवनावर होत नाही. एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून याचा आनंद घेऊन विद्यार्थ्यांनी याबाबतीत अधिक जागरूक राहून वैज्ञानिक माहिती मिळवावी, असे मत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी केले.
शहरातील जि.प. बहुविध प्रशालेच्या प्रांगणावर जि.प. शिक्षण विभाग व अस्ट्रॉनॉमी सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांसाठी सौरचण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो विद्यार्थी, .. शिक्षक व पालकांनी या घटनेचा लाभ व आनंद घेतला. यावेळी शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी सूर्यग्रहणाबद्दल माहिती दिली. त्यांनी
सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी चष्मा द्वारे घेतला आनंद 

नैसर्गिक, वैज्ञानिक आणि भौगोलिक घटनाक्रम सांगितला. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी संगीता जाधव, एकनाथ कऱ्हाळे, शंकर लेकुळे, नितीन मोरे, संजय मेथेकर, ज्ञानदत्त जऊळकर, नागेश वाईकर, हरिभाऊ मुटकुळे, पंडित अवचार, गजानन गुंडेवार, अतुल छत्रपती, दत्तराव पडोळे, अण्णा जगताप, कुलदीप मास्ट, संजय खिल्लारे, रमेश जाधव, अनिल कांबळे, किरण नागरे, प्रवीण रुईकर, संजय बोराळकर, संजय गिरी, मकरंद पेंडके, संतोष परसवाळे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने