हिंगोलीत आज नागरी सुविधा केंद्राच्या वास्तूसह पोलिस वेल्फेअर कॅटनीचे उद्घाटन
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क10 ऑक्टोंबर 2022
हिंगोली आज १० ऑक्टोबर रोजी नागरी सुविधा केंद्राच्या वास्तूसह पोलिस वेल्फेअर कँटीनेच उद्घाटन होणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांचे मार्गदर्शन व संकल्पनेतून संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे नवीन बांधण्यात आलेले भव्य किल्ला व पोलिस कर्मचाऱ्यांकरीता बांधण्यात आलेले पोलिस वेल्फेयर कँटीन
व नागरिकांच्या सोईकरिता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निर्माण केलेले नागरी सुविधा केंद्र या वास्तूंचे उद्घाटन आज १० ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी ११ वा. पोलिस उप महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र नांदेड निसार तांबोली यांच्या • हस्ते व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जि.प. मुख्य कार्यकारी संजय दैने, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, समादेशक रा. रा. पो. ब. गट क्र. १२ हिंगोली संदीप सिंह गिल व इतर वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा