मा. पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र नांदेड यांचे शुभहस्ते नविन बांधकाम केलेले पोलीस कवायत मैदानावरील किल्ला, पोलीस सबसिडअरी कॅन्टीन व नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन संपन्न
महाराष्ट्र न्यूज
नेटवर्क10 आगस्ट 2022
मा. पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांचे मार्गदर्शन व संकल्पनेतुन पोलीस मुख्यालय हिंगोली येथील पोलीस कवायत मैदानाची शोभा वाढविणारा तसेच परेड मार्चकरीता आवश्यक असलेला भव्य असा किल्ला बांधण्यात आला असुन तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारां करीता सवलतीच्या दरामध्ये घरगुती संसारी उपयोगाचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याकरीता नविन पोलीस कल्याण सबसिडअरी कॅन्टीन इमारत व पोलीस अधिक्षक कर्यालय येथे नागरीकांच्या सुविधेसाठी व नागरीकांचे प्रकरणे जलद गतीने व योग्य मार्गदर्शनाने पुर्ण होण्या करीता नव्याने नागरी सुविधा केंद्राचे निर्माण केले गेले. सदर नागरी सुविधा केंद्रात स्वतंत्र चारीत्र पडताळणी कक्ष, व मा. जिल्हाधिकारी हिंगोली व मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या संयुक्त संकल्पनेतुन पोलीस विभाग, महसुल विभाग व विधी विभाग यांची एकत्रित मिळुन प्रॉपर्टी सेल निर्माण करण्यात आले आहे. सदर पॉपर्टी सेल चा मुख्य उददेश्य म्हणजे हिंगोली जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात नागरीकांचे तकार अर्ज हे शेतीशी संबधित तसेच जमिनीच्या वादाशी संबधित असतात. अशावेळी सदरचे अर्ज पॉपर्टी सेलकडे आल्यानंतर नागरीकांना त्यांच्या शंकाचे निरसन सहज होईल व सदर सेल कडुन त्यानां त्यांचे अर्जानुसार त्यांचा प्रश्न कुठुन व कसा सोडवावा त्याबाबतची कार्यवाही या करीता मार्गदर्शन मिळेल सदर प्रॉपर्टी सेल विभागात पोलीस अधिकारी, महसुल विभागीतील अधिकारी व विधी अधिकारी यांची नेमणुक करण्यात आली आहे.
सदर पोलीस कवायत मैदानावरील नव्याने बांधण्यात आलेला किल्ला, पोलीस सबसिडअरी कॅन्टीन व नागरी सुविधा केंद्र यांचे उदघाटन आज रोजी मा. पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र, नांदेड श्री. निसार तांबोली यांचे शुभहस्ते तसेच मा. जिल्हाधिकारी हिंगोली श्री. जितेंद्र पापळकर, मा. जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली श्री. संजय दैने, पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. एम. राकेश कलासागर, समादेशक रा. रा. पो. बल गट क्र. १२ हिंगोली श्री. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. दिगांबर पोतरे, उप अभियंता श्री. माधव देशमुख यांचे उपस्थितीत संपन्न झाले. सदर कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठीत नागरीक, पत्रकार बांधव व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा