मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हिंगोली दौर्‍यावर...!

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हिंगोली दौर्‍यावर...!

हिंगोली 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे दि.९ व १० ऑक्टोंबर या दोन दिवशीय हिंगोली जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. 

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे मनसेच्या सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी १० दिवशीय मराठवाडयाच्या दौर्‍यावर निघाले आहे. याचा एक म्हणुन हिंगोली जिल्हा दौर्‍यावर दि.९ ऑक्टोंबर व दि.१० ऑक्टोंबर रोजी दोन दिवशीय हिंगोली दौर्‍यावर येणार आहेत. अमित ठाकरे हे नांदेड येथुन मोटारीने दि.९ ऑक्टोंबर रोजी रात्री शासकीय विश्रामगृहात येणार असुन दि.१० रोजी सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन नंतर सकाळी ९ वाजता सेवासन वस्तीगृहाला भेट देणार आहेत. सकाळी ९.४५ वाजता पिंपळखुटा येथे पाणीपुरवठा योजनेचे भुमिपुजन करणार आहेत. ११.३० वाजता नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराज समाधी स्थळास भेट घेऊन दर्शन घेणार आहेत. दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन व जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे यांचे घरी भेट देणार आहेत. दुपारी २.३० वाजता पासुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक व संवाद साधणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता औंढा नागनाथ येथे श्री नागनाथाची आरती व देवदर्शन करणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता परभणीकडे प्रयान करणार आहेत. यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठयासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष प्रमोद उर्फ बंडु कुटे, उपाध्यक्ष दिपकराव वडकुते यांनी केले आहे. 




 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने