पक्षच नव्हे प्रमुखपद देखील हवे!

पक्षच नव्हे प्रमुखपद देखील हवे!



महाराष्ट्र 24 न्यूज
 नेटवर्क 8 ऑक्टोंबर 2022

मुंबई : शिवसेना पक्षात झालेल्या बंडानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाच नव्हे तर पक्षप्रमुख पदावर देखील दावेदारी सांगितली आहे. या संदर्भात शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. या प्रतिज्ञापत्रात शिवसेना पक्षअध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आला आहे. आता खरी शिवसेना कोणाची आणि 'धनुष्यबाण' कोणाचे, हा वाद निर्माण झाला आहे. सध्या हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. येत्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे आठवडाभरात शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.
शिवसेनेच्या चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला होता. त्याला आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. २७ सप्टेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा आयोगाकडेच आले आहे. शिवसेनेने

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आता थेट पक्षप्रमुख पदावर दावा !



शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२२ ही शेवटची तारीख असून १५ ऑक्टोबर २०२२ रोजी अर्जांची छाननी होईल. १७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज मागे घेता येईल. तर, ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून ६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. त्यामुळे येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत निवडणूक चिन्हाबाबतचा फैसला केंद्रीय निवडणूक आयोग घेईल, अशी शक्यता आहे. आता धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांपैकी कोणाला देण्यात येईल ? की गोठवले
जाईल त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने