हिंगोलीत एटीएममध्ये चोरीच्या प्रयत्नातील एकास पकडले

हिंगोलीत एटीएममध्ये चोरीच्या प्रयत्नातील एकास पकडले

महाराष्ट्र 24 न्यूज
 नेटवर्क

हिंगोली 
 शहरातील 
शिवाजीनगर
भागातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करून एटीएम मशिनचे लॉक तोडल्याने हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर एकास निष्पन्न केल्याने त्याला ताब्यात घेतले.

शिवाजीनगर भागात बँक ऑफ महाराष्ट्रचे एंटीएम आहे. ५ ऑक्टोबरला सायंकाळी ५.४८ वाजता कोणीतरी अनोळखी व्यक्तीने चोरी करण्याचा प्रयत्न करून एटीएम मशिनचे लॉक तोडून ३० हजार रुपयाचे नुकसान केल्याने हिंगोली शहर पोलिसात अंकुश हुलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस

अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या नेतृत्वाखाली एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केल्यानंतर सुमीत सुनील नेर्लेकर याला गुन्ह्यात गुन्हे शाखेचे शेख शकील, संजय मार्के, शेख अमजद यांनी निष्पन्न करून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास संजय मार्के हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने