हिंगोलीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला 5 नोव्हेंबर पासून प्रारंभ

हिंगोलीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला 5 नोव्हेंबर  पासून प्रारंभ

महाराष्ट्र 24न्यूज
 नेटवर्क 
3 नोव्हेंबर 2022

हिंगोली महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सन २०२२-२३ या वर्षीची ५८ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा हिंगोली येथे आयोजित करण्याचा बहुमान स्थानिक हिंगोली तालुका खो-खो असोसिएशनला दिला आहे. या स्पर्धा शनिवार ५ नोव्हेंबर ते मंगळवार ८ नोव्हेंबर दरम्यान रामलिला मैदान हिंगोली येथे होणार आहेत..
राज्य व राष्ट्रीयस्तरावर हिंगोली येथे होणाऱ्या खो खो या स्पर्धा आयोजनामुळे हिंगोली जिल्हयाचे क्रीडा क्षेत्रात नावलौकीक होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा शनिवार ५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. बक्षीस वितरण सोहळा मंगळवार ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार

आहे. या चार दिवशीय राज्यस्तरीय स्पर्धेकरिता आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
तसेच स्पर्धा आयोजन संदर्भात गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून पत्रकार परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष हिंगोली तालुका खो-खो असोसिएशनचे कल्याण देशमुख यांनी केले आहे. 
हिंगोलीत महिला-पुरूषांची राज्यस्तरीय खो खो स्पर्धा प्रथमच आयोजित केली जात असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या इतर राज्यातील खो-खो प्रेमींची हजेरी राहणार आहे. या स्पर्धेसाठी विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने