बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती सप्ताहाचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहीमचे उद्घाटन
*हिंगोली दि. 18 बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती सप्ताह दि 14 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या कालावधीत धोकादायक व बिगर धोकादायक आस्थापनांना भेटी देऊन दर्शनीय भागावर ‘येथे बालकामगार काम करत नाहीत’ असे स्टीकर लावणे, हमीपत्र भरुन घेणे, पत्रके वाटप करणे यासह अनेक अन्य जनजागृती कार्यक्रम घेऊन अभियान राबविण्यात येत आहे.
दिनांक 18 नोव्हेंबर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले
कृती दलामार्फत कामगार विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक संस्थेचे प्रतिनिधींच्या मदतीने जिल्ह्यातील वीटभट्टी. खडीक्रेशर, हॉटेल, दुकान, चहाटपरी, गॅरेज धाडसत्राचे आयोजन करुन बाल मजुरांची मुक्तता करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. बाल ब किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन ) सुधारित अधिनियम 2019 अन्वये 14 वर्षांखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियामध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील आस्थापना मध्ये बालकामगार आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी टि.इ. कराड यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा