लग्नाचे आमिष दाखवून शपथपत्र ; गुन्हा दाखल....!
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 नोव्हेंबर 2022
आ. बाळापूर
लग्नाचे आमिष दाखवुन पळवून नेत तिच्याकडून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे शपथपत्र तयार करून घेतले. काही दिवस चांगले राहिले, पंरतु अचानकपणे त्या तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव आणून धर्मांतर न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथील तरुणी सोबत घडला.
या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साजिद रफीक खा पठाण रा. जवळा पांचाळ अस या आरोपी तरुणाचे नाव आहे.
एकीकडे देशभरात श्रद्धा प्रकरण जोरात गाजत असताना या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी तरुणाने रेडगाव येथील तरुणी सोबत अगोदर मैत्री केली मैत्रीचे रूपांत प्रेमात झाले. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लग्नाचे आमिष दाखवून 8 जुलै 2022 रोजी तरुणीला पळवून नेले. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठे ही आढळुन आली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. *तरुणीवर केला अत्याचार* आरोपी साजिद पठाण याने तरुणीला डोंगरकडा, जवळा बाजार, औरंगाबाद, फरीदाबाद(दिल्ली) येथे नेऊन अत्याचार केला. नंतर फरीदाबाद(दिल्ली)येथे लिव्ह इन रिलेशनशिपचा बॉण्ड तयार केला. दोन महिन्यानंतर ते डोंगरकडा येथे येऊन राहत होते मात्र काही दिवसांनंतर साजिद कडून तरुणीला धर्मांतरासाठी दबाव आणला जात होता, तरूणी धर्मांतरासाठी विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे तरुणीने सजीतला सोड चिठी देत घर गाठले आणि घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगिला. कुटुंबाने भीती पोटी हा प्रकार कुठेही सांगितला नाही. सजीडकडून वारंवार त्रास दिला जात होता, या त्रासाला कंटाळून 18 नोव्हेंबर रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाणे गाठून साजिदविरुद्ध तक्रार दाखल केली. यावरून साजिद खा पठाण याच्याविरुद्ध अत्याचार व इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला.
*सेंटरिंगचे काम करताना झाली तरुणीची ओळख* साजिद खा पठाण हा सेन्ट्रीगचे काम करतोय, तो कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे सेन्ट्रीग चे काम करीत होता, त्याने रेडगाव येथे एका ठिकाणी काम करण्यासाठी आला होता, भीती असं नव्हती का तुला काम सुरू असताना साजिदने कामाचे बाजूला असलेल्या तरुणी सोबत हळूहळू ओळख केली ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले आणि साजिदने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले तिला लग्नाच्या आम्हीच दाखवून पळून नेले.
टिप्पणी पोस्ट करा