रुग्णवाहिका-हायवा धडकेत मृतांचा आकडा तीनवर



रुग्णवाहिका-हायवा धडकेत मृतांचा आकडा तीनवर 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
23 नोव्हेंबर 2022 
आ.बाळापुर 
 कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा ते नांदेड मार्गावर हिवरा पाटीजवळ रुग्णवाहिका व हायवा ट्रक यांच्यात झालेल्या धडकेमध्ये जखमी झालेल्या पाच जण पैकी दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील किसन गोवंदे यांना एका टोने धडक दिल्याने ते जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी डोंगरकडा येथे आणण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी नांदेड येेथे नेले जात होते. डोंगरकडा येथून निघालेली रुग्णवाहिका काही अंतरावर असलेल्या हिवरा फाटयाजवळ गेली असतांना समोरून येणार्‍या हायवा ट्रकची रुग्णवाहिकेला जबरदस्त धडक बसली. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक बळीराम वाघमारे (रा. डोंगरकडा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुग्णवाहिकेतील इतर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व जखमींना  दुसर्‍या वाहने उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. मात्र रस्त्यावर किशन गोवंदे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर उर्वरीत पाच जणांना नांदेड येथे  उपचारासाठी दाखल केले आहे. 
यामध्ये उपचार घेत असलेले सुधाकर पंडित  यांचा आज रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात मृतांची संख्या आता तीन झाली असून अन्य तिघांवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने