कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये ०७ गुन्हेगारांना केले २ वर्षाकरीता हिंगोली जिल्हयातुन हददपार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
24 नोव्हेंबर 2022
सतत गुन्हेगारी कृत्य करणा-या टोळीविरूध्द मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांची
कडक कार्यवाही
मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारताच जिल्हयातील सराईत गुन्हेगार व अवैध्द धंदे चालविणा-या विरूध्द तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणा-यांविरूध्द कडक कार्यवाहीची भुमिका घेवुन असे गुन्हे सतत करणा-यां विरूध्द प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली जात असुन,
पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली श्री जी. श्रीधर यांनी आज रोजी कळमनुरी शहरातील राहणारे सराईत गुन्हेगार शेख अखील उर्फ फावडा शेख शब्बीर वय ३४ वर्ष शेख जमीर शेख खलाल वय २१ वर्ष शेख आरेफ शेख खलील वय २३ वर्ष शेख आसेफ शेख खलील वय २७ वर्ष आतीखखाँ वलदीयाखॉ पठाण वय २७ वर्ष शेख समीर उर्फ टोबो शेख खलील वय १९ वर्ष सर्व रा. इंदिरानगर कळमनुरी मोईन नाईक मतीन नाईक वय ४२ वर्ष रा. नाईकवाडी मोहल्ला कळमनुरी यांचे विरूध्द पोलीस स्टेशन कळमनुरी येथे मालमत्तेचे व शरीराविरूध्दचे १४ गुन्हे दाखल असुन नमुद इसमावर यापुर्वी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही त्यांचे वर्तनात कोणतेही सुधारणा न करता सतत संघटीतपणे गुन्हे करतच आहेत व त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांचे अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालींमुळे परीसरातील नागरीकांच्या जिवीतास तसेच संपत्तीस धोका उत्पन्न होत असल्याने मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी सदर प्रकरणी कडक प्रतिबंधक कार्यवाही बाबत आदेश दिलेवरून पो.स्टे. कळमुनरी चे पो.नि.श्री निकाळजे यांनी नमुद आरोपीतांविरूध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हददपारीचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत श्री. किशोर यांनी सविस्तर चौकशी करून नमुद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्हयातुन हददपार करणेबाबत मा.पोलीस अधीक्षक हिंगोली यांचेकडे शिफारस केल्यावरून नमुद प्रकरणी सविस्तर तपासणी करून मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी.श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये नमुद सात आरोपींना आज पासुन पुढील २ वर्षाकरीता हिंगोली जिल्हयातुन हददपार केले बाबत आदेश काढले आहेत.
मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांनी समाजात शांतता नांदावी म्हणुन सराईत गुन्हेगारांची माहीती घेवुन त्यांचे बाबत कोम्बींग व ऑलआउट ऑपरेशन मधुन त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांचे बाबत कडक प्रतिबंधक कार्यवाही करीत आहेत.
जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी यापुढेही कारवाई सुरूच राहील असे
जी श्रीधर यांनी महाराष्ट्र 24 न्यू जला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा