हिंगोली जिल्ह्यातील ६२ ग्रा.पं. च्या निवडणुका जाहीर

हिंगोली जिल्ह्यातील ६२ ग्रा.पं. च्या निवडणुका जाहीर 

महाराष्ट्र 24यूज 
नेटवर्क10 नोव्हेंबर 2022

हिंगोली राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील ७७५१ ग्रा.पं.च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. ज्यामध्ये तालुकानिहाय औंढा नागनाथ ७, वसमत १३, हिंगोली १६, कळमनुरी १६, सेनगाव १० अशा एकूण ६२ ग्रामपंचायतचा समावेश आहे..
ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका यापूर्वी लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या; परंतु आता राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतच्या निवडणुकी संदर्भात कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे १८ नोव्हेंबर पासून आदर्श आचार संहिता लागू होणार असून या गावामधील

मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा खासदार, आमदार, संबंधित स्थानिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आचार संहितेचे उल्लंघन करता येणार नाही. निवडणुकीसाठी संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज दाखल करावे लागणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमात तहसीलदारांमार्फत निवडणुकीची नोटीस १८ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार, निवडणुकीची २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या दरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत दिली आहे. ५ डिसेंबरला अर्जाची छाननी होणार असून ७ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. याच दिवशी निवडणुकीचे आहे...

जिल्ह्यातील तालुकानिहाय औंढा नागनाथ ७, वसमत १३, हिंगोली १६, कळमनुरी १६ आणि सेनगाव १० अशा एकूण ६२ ग्रा. पं. मध्ये निवडणुका होणार आहेत.

चिन्ह उमेदवारांना वाटप दुपारी ३ वाजेनंतर होणार आहे. १८ डिसेंबरला निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेमध्ये होणार आहे तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. २३ डिसेंबरला निकालाची अधिसूचना जारी केली जाणार आहे. 

जनतेतून सरपंचाची निव राज्यामध्ये संत्तातर झाल्यानंतर जनतेतून सरपंचाची निवड करण्याचाj निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जनतेतून थेट सरपंचाची निवड होणार आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने