हिंगोली संघर्ष समितीचे रेल्वे विभागाला निवेदन

हिंगोली संघर्ष समितीचे रेल्वे विभागाला निवेदन

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क 10/11/2022

हिंगोली जालना-छपरा रेल्वेसाठी हिंगोलीत सुरू झालेल्या आंदोलनांतर्गत बुधवारी संघर्ष समितीतर्फे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदन देण्यात आले. यामध्ये २३ नोव्हेंबर पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
बुधवारी रेल्वे संघर्ष समितीतर्फे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार गजाननराव घुगे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बसंतकुमार भट्ट, शेख नईम शेख लाल, पंकज अग्रवाल, ,दिनेश बगडीया, पत्रकार सुधाकर वाढवे, नौमान शेख, राजेंद्र हलवाई आदी उपस्थित होते. हे निवेदन स्विकारून प्रभारी सहाय्यक स्टेशन मास्टर मनोजकुमार व रेल सुरक्षा बलचे शेकार यांनी संघर्ष समितीची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले. २३ नोव्हेंबर रोजी जालना छपरा रेल्वे गाडीचे मार्ग न बदलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने