हिंगोलीत खो-खो स्पर्धा; पुरुष गटात मुंबई, तर महिला गटात पुणे विजयी

हिंगोलीत खो-खो स्पर्धा; पुरुष गटात मुंबई, तर महिला गटात पुणे विजयी

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क9 नोव्हेंबर 2022

 हिंगोली मंगळवारी रात्री : प्रकाशझोतात झालेल्या पुरुष गटातील अटीतटीच्या सामन्यात मुंबई
उपनगर संघाने पुणे संघाला एका गुणाने पराभूत करीत खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. तर महिलांमध्ये मात्र पुणे संघाने ठाण्याला मात देत चषक जिंकला.
रामलीला मैदानावर मंगळवारी पुरुष गटात अंतिम सामन्यात मुंबई उपनगर संघाने जोरदार प्रदर्शन करीत पुणे संघाचा एका गणाने पराभव केला.
मुंबई उपनगर संघाने दोन्ही डावात डावात १९ गुण घेत आघाडीवर होता. तर पुणे संघाने तेवढ्याच आक्रमकतेने खेळ करीत दोन्ही डावांत १८ गुण मिळविले. त्यामुळे पुणे संघाला एका गुणाने हा सामना गमवावा लागला, मुंबई संघाला केवळ एका गुणाने निसटता विजय मिळाला. तर ठाणे व सांगली संघाला विभागून अनुक्रमे तिसरा व चतुर्थ क्रमांक देण्यात आला.
करण्यात आले. यावेळी माजी खासदार शिवाजी माने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापाळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, गजानन घुगे, रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवदास बोड्डेवार, चंद्रजित जाधव, संजय मुंढे, गोविंद शर्मा, सचिन गोडबोले, अरुण देशमुख, पवन पाटील, प्रशांत इनामदार, नागनाथ गजमल, संतोष सावंत, कल्याण देशमुख, नरेंद्र रायलवार, संजय भुमरे, प्रा. शिवाजी वायभासे, सुधाकर वाढवे सुखबिरसिंग अलग, विशाल शिंदे, नागनाथ लोखंडे, चिरंजीवी कट्टा, भागवत इंगोले, मनोहर डुरे, प्रा. नलगे, प्रा. लोंढे, कदम आदींची उपस्थिती
तर महिलांच्या अंतिम सामन्यात ठाणे संघाने चुरशीच्या सामन्यात पहिल्या डावात पाच गुण मिळविले. त्यामुळे पुणे संघाने पहिल्या डावात एका गुणाने आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात ठाणे संघाची कामगिरी होती. बेसुमार राहिली. दुसऱ्या डावात पुणे संघाने सहा गुण मिळविले तर ठाणेनेही सहा गुण मिळविले होते; परंतु अत्यंत चुरशीच्या सामन्यात पुणे संघाने आपल्या पहिल्या डावातील एका गुणाच्या आधारे ट्रॉफीवर नाव कोरले, पुण्याची प्रियंका इंगळे हिने उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पाच हजारांचे पारितोषिक देण्यात आले.

उस्मानाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र पुरुष व महिला संघासाठी निवड समितीची घोषणा झाली. यामध्ये नागनाथ गजमल हिंगोली, प्रशांत देवळेकर रत्नागिरी, संदेश आंबे मुंबई, तर सुप्रिया गाढवे उस्मानाबाद आदींची निवड झाली. सूत्रसंचालन हरिभाऊ मुटकुळे यांनी केले तर आभार स्वागताध्यक्ष कल्याण विजेत्यांना पारितोषिक वितरण देशमुख यांनी मानले..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने