राहुल गांधी यांच्या स्वागताकरिता हिंगोलीकर सज्ज- मा. आमदार भाऊराव पाटील

राहुल गांधी यांच्या स्वागताकरिता हिंगोलीकर सज्ज-
 मा. आमदार भाऊराव पाटील 

महाराष्ट्र 24 न्यूज
 नेटवर्क 13 नोव्हेंबर 2022
हिंगोली-/--
काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशात एकता निर्माण करण्याकरिता भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सोमवार दि.  14 नोव्हेंबर रोजी हिंगोली मध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील नागरिक उत्सुक असून सर्वांनी सोमवारी सकाळी सहा वाजता खटकाळी बायपास येथे सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी केले आहे.
देशामध्ये भाजपच्या वतीने जाती-धर्मांमध्ये द्वेष भाव निर्माण केल्या जात आहे. महागाई आणि बेरोजगारी मुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे अवघड झाले आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी आणि संपूर्ण नागरिकांची मने जोडण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी पदयात्रा काढली आहे.  पदयात्रा 14 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता खटकाळी बायपास येथून हिंगोली नगरीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खटकाळी बायपास येथून ते शिवलीला लॉन पर्यंत पोहोचतील. यानंतर दुपारी एक ते चार पर्यंत त्यांचा या ठिकाणी विश्राम असणार आहे. चार वाजता ही पदयात्रा वाशिम मार्गावरील वडद कडे प्रस्थान करेल. राहुल गांधी यांचा या ठिकाणी मुक्काम असणारा असून 15 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता ते कनेरगावकडे निघणार आहेत. त्यानंतर ही यात्रा विदर्भामध्ये प्रवेश करणार आहे. राहुल गांधी यांच्या या पदयात्रेचे स्वागत करण्यासाठी सर्व नागरिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस नेते माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने