सोयाबीन चोरी करणारे टोळी २४ तासाच्या आत अटक७ लाख २३ हजार १०० रुपयाचा मुददेमाल जप्त

सोयाबीन चोरी करणारे टोळी २४ तासाच्या  आत अटक
७ लाख २३ हजार १०० रुपयाचा मुददेमाल जप्त

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 नोव्हेंबर 2022 

स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कार्यवाही

हिंगोली जिल्हया हददीत मागील काही दिवसापासून चोरीचे गुन्हे घडले होते. गुन्हेगारांना तात्काळ अटक करून गुन्हयांवर आळा घालण्याचे आदेश मा. जी. श्रीधर साहेब, पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली चे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांचे मार्गदर्शनात तपास पथकाने पोस्टे सेनगाव हददीत उटी ब्रम्हचारी शेत शिवारातील आखाडया येथे सोयाबीन चोरी संदर्भात गुन्हा घडताच तात्काळ घटनास्थळी भेट देवून गुन्हयाचा बारकाईने अभ्यास करून गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे १) विजय संभाजी चव्हान वय २२ वर्ष, व्य. मजूरी रा. सावंगी म्हाळसा ता. जिंतूर जि.परभणी, २) माधव उर्फ करण कैलास सिंग बयास, वय १९ वर्ष रा. उटी ब्रम्हचारी ता. सेनगाव जि. हिंगोली ३) गोपाल दशरथ व-हाडे रा. उटी ब्रम्हचारी यांना निष्पन्न करून यातील दोन आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपीतांकडुन गुन्हयात चोरी गेलेले ४० सोयाबीनचे कटटे, नगदी रुपये, एक मोबाईल व गुन्हा करणेकामी वापरलेले वाहन असा एकूण रू. ७,२३,१००/- रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीतांकडुन चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री जि. श्रीधर, मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री. उदय खंडेराय, सपोनि. शिवसांब घेवारे, पोउपनि विक्रम विटूबोने पोलीस अंमलदार गजानन पोकळे, सुनिल अंभोरे, राजुसिंग ठाकुर, नितीन गोरे, विशाल घोळवे, किशोर सांवत, अकाश टापरे, सुमील टाले चालक तुषार ठाकरे यांनी केली. गुन्हा घडल्यानंतर अगदी २४ तासात गुन्हा उघड करून संपुर्ण मुददेमाल जप्त केल्यामूळे पान इरफान पठान, पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर साहेबांनी स्थागुशा पथकाचे अभीनंदन केले 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने