भारत जोडो यात्रा हिंगोलीकराच्या प्रतिसादाने राहुल गांधी भारावले
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 नोव्हेंबर 2022
हिंगोली : काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने हिंगोली विधानसभा मतदार दिली. संघातील नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाने खा. राहुल गांधी भारावुन
गेल्याची माहिती आ. गोरेगावकर यांनी पत्रकारांशी बोलतांना
दिली
१४ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सावरखेडा पूल येथून हिंगोली विधानसभा क्षेत्रात दाखल झाली. या पदयात्रेमध्ये संपूर्ण हिंगोली विधानसभा मतदार संघातील हजारो नागरिक व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे संपूर्ण हिंगोली शहर गजबजून गेले होते. एवढेच नव्हे तर सायंकाळी अंधार पडल्यावर देखील माळहिवरा पाटी पर्यंत नागरिकांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा पूर्ण केली. नागरिकांच्या प्रतिसादाचे स्वतः राहुल गांधी यांनी आपल्याजवळ व्यक्तिशः कौतुक
केल्याचे माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर म्हणाले. या शहरात न भूतो न प्रतिसादाच्या या माध्यमातून हिंगोली विधानसभेमध्ये काँग्रेस पक्ष आजही तळागाळापर्यंत पोहोचलेला असून तेवढाच मजबूत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर या पदयात्रेसाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी व तळागाळातील परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकत्यांचे तसेच उत्स्फुर्त सहभाग नोंदविणाऱ्या जनतेचे देखील भाऊराव पाटल गोरेगावकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा