हिंगोलीत वाहतूक पोलिसाला मारहाण; तिघावर गुन्हा दाखल

हिंगोलीत वाहतूक पोलिसाला मारहाण; तिघावर गुन्हा दाखल

महाराष्ट्रा न्यूज 
नेटवर्क 3 नोव्हेंबर 2022

हिंगोली शहरातील रेल्वे गेटजवळ वाहतूक पोलिसास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने तिघा विरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंगोली शहर वाहतूक शाखेचे रवि माधवराव गंगावणे हे ३१ ऑक्टोबर रोजी रेल्वे गेटजवळ गणवेशामध्ये कर्तव्य बजावत होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आरोपी कार क्र. एमएच १२ जीझेड ३१२१ चा चालक दत्ता सूर्यवंशी रा. चिकाळा ता. हदगाव, शेख माजीद व शेख रशीद दोघे रा. हिंगोली यांनी संगणमत करून रवि गंगावणे यांना शिवीगाळ करून गच्ची धरून थापडबुक्याने मारहाण केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस उपनिरीक्षक वग्गे यांनी भेट देऊन तपासणी केली. या प्रकरणातील कार चालक दत्ता सूर्यवंशी यास ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वग्गे ह्या करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने