संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडे मारून निषेध

संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडे मारून निषेध करण्यात आला..
महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क 7 नोव्हेंबर2022

     राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने नांदेड येथे अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
      अब्दुल सत्तार यांनी संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल जे आक्षेपार्य वक्तव्य केले त्यावरून राज्यातील तमाम महिला प्रति असलेली अत्यंत नीच भावना अब्दुल सत्तार यांच्या तोंडून बाहेर पडल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याचा निषेध करून लवकरात लवकर त्यांनी माफी मागून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली.
   अब्दुल सत्तार यांनी संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांची माफी न मागितल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना राज्यात फिरू न देता त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस कल्पनाताई डोंगलिकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रौफ जमीनदार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर जिल्हाध्यक्ष सिंधुताई देशमुख, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रियंका कैवारी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अजिंक्य देशमुख,डॉ.उत्तमराव सोनकांबळे, प्रेमजीत कौर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस ॲड.बाळासाहेब सोनकांबळे,राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद दानिश, संदीप क्षीरसागर, जितेंद्र काळे,शहर उपाध्यक्ष माधव पाटील, निखिल नाईक, विधानसभा अध्यक्ष आत्माराम कपाटे, अक्षय सोनकांबळे,युवक तालुकाध्यक्ष कैलास पाटील कदम, पवन इंगोले,  गणेश आरसुळे, गणेश जोगदंड, प्रिया हंबर्डे, दीपमाला खंदारे, प्रियंका मुटकुळे, नईम खान, सरफराज अहमद, सलमान बिल्डर, सुमित सरपाते, गौतम भद्रे, खदीर कुरेशी हसीना बेगम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने