पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा 25, मार्चला हिंगोली जिल्हा दौरा

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा  25, मार्चला हिंगोली  जिल्हा दौरा 

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
24 मार्च 2023

 राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवार, दि. 25 मार्च, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 
शनिवार, दि. 25 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता सिल्लोड निवासस्थान येथून सिल्लोड-भोकरदन-जाफ्राबाद-देऊळगांव राजा-समृध्दी मार्गे हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता भिरडा ता.जि.हिंगोली येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देतील. सकाळी 11.00 वाजता हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित जिल्हा कृषि महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.00 वाजता सिल्लोड कडे प्रयाण करतील अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने