अखिल भारतीय मराठा महा संघाच्या हिंगोली जिल्हाध्यक्ष पदी बालाजी वानखेडे यांची निवड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
24मार्च2023
अखिल भारतीय मराठा महासंघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पैठण येथे आयोजित करण्यात आली होती.हि बैठक राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अखिल भारतीय मराठा महासंघाची राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आढावा बैठकीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाजातील एक अग्रेसिव युवा नेतृत्व बालाजी वानखेडे यांची हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली.
वानखेडे हे मागील अनेक वर्षापासून मराठा महासंघामध्ये युवक जिल्हाध्यक्ष पदावरून कामे करत होती .या कामाची दखल घेत राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये बालाजी वानखेडे यांना हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड केली. या निवडीचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप उपाध्यक्ष संतोष नानवटे सरचिटणीस संभाजी राजे दहातोंडे, युवकचे प्रदेश अध्यक्ष रंजीत जगताप, दशरथ पिसाळ, विभागीय अध्यक्ष भुषण देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले
पैठण येथे घेण्यात आलेल्या मराठा महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील अनेक मराठा तरुण-तरुणी पदाधिकारी मोठ्या संख्येने आले होते.
हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी बालाजी वानखेडे यांची निवड झाल्याबद्दल हिंगोली येथील अनेक ठिकाणी बालाजी वानखेडे यांच्या शुभेच्छांचा वर्षाव व झाला आहे. बालाजी वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यातील मराठा महासंघाची पुढील कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे यांनी सांगितले
टिप्पणी पोस्ट करा