लग्नाचा तगादा लावल्याने तृतीयपंथीयाने केला तरुणाचा गळा आवळुन खुन दोघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
31 मार्च 2023
शहरातील खुशालनगर भागात एका तृतीयपंथीयाने माझ्या सोबत लग्न का करत नाही या कारणावरून तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. अशोक गजानन आठवले (२३) रा.नवलगव्हाण, ता. हिंगोली असे मृत तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथील अशोक आठवले हे हिंगोली शहरात मागील काही वर्षापासून ऑटो चालविण्याचे काम करतात. तीन महिन्यापुर्वीच तो हिंगोलीतील खुशालनगर येथे राहण्यासाठी आले होते. या ठिकाणी राहात असलेल्या प्रिया निरसिंग तुरमळु उर्फ दीपक नरसिंग तुरमळु या तृतीयपंथीयाशी त्याची ओळख झाली होती. त्यामुळे अशोक तिच्याकडे राहत होता.
दरम्यान, गुरुवारी अशोक यास तु माझ्या सोबत लग्न कर असे प्रिया उर्फ दीपक याने त्याच्या मागे तगादा लावला होता. मात्र त्याने नकार दिला असता प्रिया उर्फ दीपक याने शेख जावेद याच्याशी संगणमत करून अशोक यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेतल्याचा बनाव करून त्याला उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केलेे. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकार्यांनी जाहिर केले.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिरी, उपनिरीक्षक अशोक कांबळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी प्रिया उर्फ दीपक यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी देविदास आठवले यांच्या तक्रारीवरून प्रिया उर्फ दीपक व शेख जावेद या दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात खूनाचा गु्ुन्हा दाखल झाला आहे
टिप्पणी पोस्ट करा