हिंगोली नगरपालिकेने राज्यातून पटकावला तिसरा क्रमांक पाच कोटीचे बक्षीस
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 एप्रिल 2023
महाराष्ट्र शासनाने शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये आयोजित केली होती.सदर स्पर्धा ही सहा गटामध्ये विभाजित केली होती.यामध्ये अ वर्ग नगर परिषद आणि ब वर्ग नगर परिषद मिळुन एक गट केला होता.त्या अनुषंगाने दिनांक 20 एप्रील 2023 रोजी नगर विकास दिना निमीत्य महाराष्ट्र शासनाव्दारे आयोजीत शह सौदरीकरण व स्वच्छता -2022 मध्ये अ वर्ग आणी ब वर्ग नगर परीषद गटामधुन उल्लेखनीय कामगीरी केल्याबदल महाराष्ट्र राज्यामधुन तृतीय क्रमांक पटकाविण्यात आला असुन सन्मान पत्र व पाच कोटी रुपयाचा धनादेश मा,मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणविस, शालेय शिक्षण मंत्री मा.श्री.दिपक केसरकर,विधानसभा अध्यक्ष मा.श्री.राहुल नार्वेकर, प्रधान सचिव (नवी-2) नगर विकास विभाग, मा.श्री.सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक, मा.श्री.किरण कुलकर्णी ईत्यादि मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र व धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच नगर विकास विभाग दिनाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या विविध कमामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल अ आणि ब वर्ग नगर परिषद गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकावल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी मुख्याधिकारी श्री. अरविंद मुंढे, शहर अभियंता श्री. रत्नाकर अडसिरे, स्वच्छता निरिक्षक बाळु बांगर, शहर समन्वयक श्री. आशिष रणसिंगे, शहर अभियान व्यवस्थापक श्री. पंडित मस्के आणि श्री. प्रवीण चव्हाण यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला.आहे
टिप्पणी पोस्ट करा