वसमत अल्पवयीन मुलीस देहविक्रीचा करणाऱ्या माजी महिला पोलिसासह दोघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
गुरुवार 6 एप्रिल 2023
वसमत येथील श्रीनगर भागातील एका घरावर वसमत पोलिसांनी छापा मारला. येथे एका अल्पवयीन मुलीस वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करून घरात वेश्या व्यवसाय चालवत असल्याचेही समोर आले. या प्रकरणी एका माझी महिला पोलीसासह दोघांना ताब्यात घेऊन पोक्सो व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
वसमत शहरातील श्रीनगर कॉलनीतील एका माजी महिला पोलिसाच्या घरी कुकर्म चालवले जात असल्याची खबर पोलिसांना लागली. वसमत शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी छापा मारला.
आरोपीमध्ये माजी महिला पोलिस कर्मचारी
श्रीनगर कॉलनीमध्ये एका अल्पवयीन मुलीला कुकर्म करण्यासाठी बोलावून वेश्या व्यवसाय चालविला जात असताना गुन्हा दाखल झाला. ज्यामध्ये आरोपीमध्ये माजी महिला पोलिस नम्रता विठ्ठल पावडे व वैभव अच्युत चौरे या दोघांचा समावेश आहे..
या छाप्यात एका अल्पवयीन मुलीस तिच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन देह विक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याची घटना समोर आली. एका अल्पवयीन मुली सोबत कूकर्म करण्यासाठी आलेला एक आरोपी ही आढळून आला. सदर महिलेने आपल्या घरात कुकर्म करण्यासाठी जागा देऊन वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचेही या छाप्यात समोर आले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून वैभव अच्युत चौरे रा. पिंपळाचौरे ता. वसमत व श्रीनगर भागातील रहिवाशी महिला नम्रता विठ्ठल पावडे या दोघा विरोधात पोक्सो आणि पिटा अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम करत आहेत. यामधील अल्पवयीन मुलीला बालसुधार गृहात पाठविण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती.
या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या वेश्या व्यवसाय करणाऱ्याचे जिल्हा बाहेर पळ काढला अशी दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू होती
टिप्पणी पोस्ट करा