देशी विदेशी दारुचा साठा पकडला''स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली ची कार्यवाही'

'देशी विदेशी दारुचा साठा पकडला'
'स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली ची कार्यवाही'

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
6 एप्रिल 2023
आगामी काळातील हनुमान जयंती व इतर महापुरुषांच्या जयंती संदर्भात हिंगोली जिल्हयातील अवैध दारु विक्रीवर कठोर प्रतिबंध घालण्यासंदर्भाने पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि पंडीत कच्छवे यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे स. पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाची विशेष पेट्रोलींग सुरु असतांना दि.०६.०४.२०२३ रोजी पोलीस पथकास गोपनिय माहिती मिळाली की, यवतमाळ जिल्हयातुन हिंगोली जिल्ह्यात अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतुक होत आहे अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस पथकाने पोलीस स्टेशन कळमनुरी हद्दीत गौळबाजार नजीक सापळा रचला असता दारु वाहतुक करणारा आरोपी नामे गजानन शिवराम ढाकरे रा. पुसद याने त्याची स्वतःची इंडीगो कार क्र. एमएच ०६ डब्ल्यु १९२९ मध्ये देशी व विदेशी दारुचे एकुण आठ बॉक्स टाकुन हिंगोली जिल्हयात येतांना मिळुन आल्याने सदर आरोपी कडुन देशी विदेशी चे आठ बॉक्स दारु व कार असा एकुण ४,२९,०००रु चा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन कळमनुरी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री पंडीत कच्छवे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार संभाजी लकुळे, गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, ज्ञानेश्वर पायघन, गणेश लेकुळे, चालक प्रशांत वाघमारे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने