हिंगोली जिल्ह्यात तापमानात वाढ रुग्णांनी तात्काळ उपचार घ्यावा डॉ अखिल अग्रवाल

हिंगोली जिल्ह्यात तापमानात वाढ रुग्णांनी तात्काळ उपचार घ्यावा 
डॉक्टर अखिल अग्रवाल


महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
23 एप्रिल 2023 

उत्तर भारतातील मैदानी राज्ये तसेच पूर्व भागात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही  दिवस उष्णतेची लाट पसरणार आहे. 

  सध्या हिंगोली  जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअस एवढे वाढले  आहे. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे.उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नेमके काय उपाय करावेत हे आज जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर उष्माघाताची कारणे , लक्षणे आणि उपायाविषयी जाणून घेणार आहोत.
उष्माघाताची लक्षणे
वातावरणातील तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रण यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे, स्नायूंना आकडी येणे अशी विविध लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी घाबरून न जाता तात्काळ  जवळच्या हॉस्पिटलमध्ये  जाऊन डॉक्टरासी  संपर्क साधावा.

*डॉक्टर अखिल अग्रवाल काय सांगतात* 

उन्हात घराबाहेर पडताना अशी घ्या काळजी
उष्माघात होवू नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने पाणी प्या
घरात अथवा घरातून बाहेर पडताना सुती कपड्यांचा वापर करा
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी चा वापर करा
सोबतच बूट किंवा चप्पलचा वापर करा
प्रवास करताना पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवावी.
आहारात याचा करा वापर
उन्हाळा वाढल्याने फ्रिजमधील अतिथंड पाण्याचा वापर केला जातो. यापेक्षा माठाचा वापर करा. शक्य असल्यास अतिथंड पाणी पिऊ नका
रस्त्यावरील बर्फ घातलले ताक, लस्सी, सरबत आणि इतर पदार्थ टाळा
यापेक्षा घरातील फ्रेश ताक प्या.
आहारात पालेभाज्या, कडधान्य आणि फळांचा वापर वाढवा.

इतक सगळ करूनही जर तुम्हाला उन्हाळ्यात त्रास होवू लागल्यास तात्काळ
रुग्णांनी जवळच्या सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलला  संपर्क साधावा 
असे 
लक्ष्मी लाईव्ह केअर हॉस्पिटल चे डॉक्टर
अखिल अशोक अग्रवाल यांनी महाराष्ट्र 24 न्यूज ला बोलताना  सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने