हिंगोलीत महात्मा बसवेश्‍वर यांची उत्साहात जयंती साजरी

हिंगोलीत महात्मा बसवेश्‍वर जयंती साजरी

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
22 एप्रिल 2023 
हिंगोली 
महात्मा बसवेश्वर यांची जयंती  शनिवारी  साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, विरशैव सभेचे अध्यक्ष सुधीरआप्पा सराफ, भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील, पप्पू चव्हाण, सुरेशआप्पा सराफ, हभप शिवचरण रटकलकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी आ.मुटकुळे यांनी विरशैव समाजाच्या आय्या मठासाठी सभागृह बांधण्यासाठी कटीबध्द असल्याचे  सांगितले. तसेच पुढील वर्षी महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा  उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवचरण रटकलकर यांनी केले. तर प्रा.डॉ.बस्वराज लक्षटे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विरशैव सभा, शिवा संघटना, बसवेश्वर बिग्रेड, तसेच बसव परिषदेचे शिवचरण रटकलकर, डॉ.स्नेहल नगरे, संतोष परसवाळे, भिमा शंकरआप्पा सराफ, राहुल धनमने, विशाल गोटरे, महेश जैनापुरे, शाम स्वामी, नागेश देवके, संजय पाटील, प्रा. गंगाधर मुपकलवार, विकास टाले, नवनाथ कानबाळे, शुभम सराफ, नागेश धनमने, निखिल लिंबाळकर, राहुल सराफ, स्वप्नील परसवाळे, बाळु धनमने,  पिंटू टाले आदीनी पुढाकार घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने