हिंगणीतील अट्रॉसिटी व मारहानी प्रकरणातील दोघांची निर्दोष
मुक्तता.
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
सोमवार 23 एप्रिल 2023
हिंगणी ता. कळमनुरी जि.हिंगोली येथे फिर्यादी शेतातील रस्त्याहून जात असतानी त्याला मारहाण
करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरुन पो.स्टे. कळमनुरी येथे गुर.नं. ४१/२०२०
हा गुन्हा आरोपी नामे संतोष घुगे व अनील घुगे यांच्या विरुध्द कलम ३ (२) (V-A) अ.जा.ज.अ.प्र.कायदा व कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भा. द. वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता
दोषारोप पत्र (spl.case no. 64 / 2020 ) माहाराष्ट्र शासन विरुध्द संतोष घुगे जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान
सरकारी पक्षा तर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले होते व दोन्ही पक्षाचे
अंतीम युक्तीवाद ऐकून वि.न्यायधिश श्री. डी. जी. कांबळे साहेब यांनी दि. २१/०४/२०२३
आरोपीची विरुद्ध कोणतेही पुरावे स्पष्ट न झाल्याने दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली
आरोपीच्या वतीने ॲड सतीश देशमुख, ॲड सौ. सुनीता देशमुख, ॲड शामकांत देशमुख, ॲड प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
अँड अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी काम पाहिले व युक्तीवाद केला व त्यांना ॲड शरद देशमूख ॲड आदित्य ऊर्फ शुभम सतीश देशमुख, ॲड आरीफ पठाण, ॲड राहूल देशमूख ॲड विराज देशमुख, ॲड योगेश खिल्लारी (पाटील), ॲड रजत देशमुख, ॲड अविनाश राठोड, ॲड प्रकाश मगरे, ॲड आनंद खिल्लारे, ॲड सुमीत सातव, ॲड मुददसीर अ. रहीम, अँड लखन पठाडे, ॲड श्रध्दा जैस्वाल मॅडम ॲड आकाश चव्हाण, ॲड शुभम मुदीराज यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा