कनेरगाव नाका येथील मुस्लिम बांधवांनी गेली एक महिना पवित्र रमजान महिन्यातील उपवास धरून दिनांक 22 एप्रिल 2023 शनिवार रोजी पवित्र रमजान ईद या दिवशी कनेरगाव नाका येथील ईदगाह मध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन रमजान ईद साजरी केली व नंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना गळाभेट करून हार्दिक शुभेच्छा दिल्या
. तसेच गावातील सर्व मित्र परिवार व इतर समाजातील नागरिकांना सुद्धा कनेरगाव नाका येथील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. रमजान ईद च्या दिवासी ईदगाह मध्ये मुस्लिम समाज नमाज पढत असताना पोलीस कर्मचारी सुद्धा हजर होते त्यामध्ये पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक जाधव व त्यांचे सहकारी होमगार्ड उपस्थित होते.
नमाज झाल्या नंतर मुस्लिम बांधवांनी आपल्या मित्र परिवाराला घरी नेऊन शिरखुर्मा आणि सोबत नाष्टा देऊन आनंद व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा