फोटो मिक्सिंगने महिलेचा व्हिडीओ केला व्हायरल शहर पोलिसात गुन्हा दाखल

फोटो मिक्सिंगने महिलेचा व्हिडीओ केला व्हायरल शहर पोलिसात गुन्हा दाखल 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
26 एप्रिल 2023

हिंगोली एका महिलेचा फोटो दुसऱ्याच्या फोटोसोबत मिळवून त्याला अश्लील आवाज देण्यात आला व हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

शंकर गांधी (रा. तलाबकट्टा हिंगोली) असे आरोपीचे नाव आहे.
 शहरातील एका भागातील एका ४० वर्षीय महिलेचा व अन्य एकाचा फोटो एकत्र करून त्याला अश्लील आवाज दिला. तयार झालेला व्हिडीओ आहेत.
इन्स्टाग्राम व फेसबुकवर टाकून महिलेची बदनामी केली. याशिवाय पतीलाही धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना २३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला 
. पुढील तपास पोलिस निरीक्षक 
सोनाजी आम्ले  करत आहेत

Post a Comment

أحدث أقدم